तू माझी बायको आहेस म्हणत अल्पवयीन मुलीवर सांगलीत अत्याचार!
सांगली : खरा पंचनामा
तू माझी बायको आहेस असे म्हणत एका अल्पवयीन मुलीवर सांगलीत अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एका तरुणाविरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बसवराज मल्लीकार्जुन कोठावळे (रा. चेतना पेट्रोलपंपाजवळ, सांगली) असे गुन्हा दाखल दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. संशयित कोठावळे हा होमीओपॅथीची औषधे देतो. १० मे रोजी संशयित कोठावळे याची पीडितेशी ओळख झाली होती. त्यानंतर संशयिताने पीडितेस तु माझी बायको आहेस, असे म्हणत तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर पीडितेचे कुटुंबिय संशयितास जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी करून धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक पल्लवी यादव तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.