Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अहो आश्चर्यम : अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच!

अहो आश्चर्यम : अपघाताच्या गुन्ह्यात फिर्यादी अन् आरोपी एकच! छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

सोमवारी सायंकाळी बीबी-का-मकबऱ्यासमोर चारचाकी व दुचाकीचा अपघात झाला. यात जखमींनी अचानक तक्रारीस नकार दिला. त्यानंतर, एका हॉटेल चालकाने ठाण्यात हजर होऊन अपघात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना, तक्रारदाराच्या तक्रारीवरून तक्रारदारालाच आरोपी करत, एक आगळा वेगळा गुन्हा बेगमपुरा पोलिसांनी दाखल केला. 

सोमवारी मकबरा परिसरात (एम एच १५ एचएम ९९५२) या कार चालकाने दोघांना उडविले. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार यात एक उच्चपदस्थ अधिकारी होता. हनुमान टेकडी परिसरात एका सोसायटीत कार सोडून तो पसार झाला. जखमी रात्री ठाण्यातही गेले. मात्र, अचानक काही कॉल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. 

याच दरम्यान पडेगावमधील रायबा हॉटेलचे चालक समीर अंबारखाने हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. हा अपघात माझ्याकडून झाल्याची कबुली देत, अपघातानंतर मी घाबरल्याने निघून गेलो, असा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी अंबारखाने यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

या संदर्भात एक सेवानिवृत्त अधिकारी म्हणाले, हा गुन्हाच योग्य प्रकारे दाखल केला नाही. एखाद्या घटनेत आरोपी स्वत: ठाण्यात हजर होत असेल, तर उपस्थित पोलिस अंमलदार, डीओने त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते, शिवाय डायरी नोंदमध्ये तसे नमूद केले, तरी न्यायालयात तेही एफआयआरच्याच समान मान्य केले जाते. त्यामुळे एफआयआरमध्ये फिर्यादी व आरोपी एक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.