Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली!

माझ्या भारतमातेची तुम्ही हत्या केली!नवी दिल्ली : खरा पंचनामा

संसदेच्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चेला सुरुवात झाली. भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी आपल्याला लोकसभेत घेतलं याबाबत लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. तसेच मागील वेळी मी जेव्हा अदानी यांच्यावर बोललो तेव्हा काहींना त्रास झाला. यावेळी मी हृदयापासून, मनापासून बोलणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. मणिपूर हिंसाचारवरुन राहलु गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. मी जेव्हा मणिपूरला गेलो होतो, तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांशी, पीडित लोकांसोबत संवाद साधला. त्यावेळी एक महिला म्हणाली की, माझ्या डोळ्यांसमोर मुलाची गोळ्या घालून हत्या केली. रात्रभर ती आई त्या मृतदेहासोबत राहिली, असं राहुल गांधी यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. भारताचा आवाज एकच आहे. द्वेष दूर करावा लागेल. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेलेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. आज मणिपूर हे मणिपूर राहिलेले नाही. तुम्ही मणिपूर तोडले आहे. तुम्ही भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारत मातेची हत्या करणारे आहात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

राहुल गांधी यांच्या या विधानावरुन सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. रावण फक्त दोन लोकांचे ऐकत असे, मेघनाद आणि कुंभकर्ण. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी हे अमित शाह आणि अदानी या दोनच लोकांचे ऐकतात. हनुमानाने लंका जाळली नाही, अहंकाराने लंका जाळली. रामाने रावणाला मारले नाही, त्याच्या अहंकाराने मारले. तुम्ही देशभर रॉकेल फेकत आहात. तुम्ही हरियाणा जाळत आहात. तुम्ही संपूर्ण देश पेटवण्यात व्यस्त आहात, असा निशाणा राहुल गांधींनी भाजपावर साधला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.