Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच घेऊन पळून जाणाऱ्या उपनिरीक्षकासह हवालदाराला पकडले!

लाच घेऊन पळून जाणाऱ्या उपनिरीक्षकासह हवालदाराला पकडले!



बीड : खरा पंचनामा

अपहरणाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी परत करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये लाच घेताना बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कम स्वी र पळून जात असताना एसीबीच्या पथकाने दोघांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण कनलाल किर्तने (वय 34), पोलीस हवालदार रणजीत भगवान पवार (वय 42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या मुलावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये जामीन देण्यासाठी व गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता स उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने व पोलीस हवालदार रणजीत पवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच पडताळणी दरम्यान अधिकचे तीन हजार रुपये अशी अठरा हजार लाचेची मागणी केली. पथकाने पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. आरोपींनी मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी आठ हजार रुपये दाखल गुन्ह्यातील सह आरोपी ड्रायव्हर यांच्याकडून घेतले. तर उर्वरित दहा हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकाली. 

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याचे समजातच ते लाचेची रक्कम घेऊन मोटारसायकलवर पळून गेले. एसबीच्या पोलिसांनी दोघांचा पाठलाग करुन लाच रकमेसह रंगेहात पकडले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.