Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील नागरी समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडणार आण्णा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांचा इशारा

सांगलीतील नागरी समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडणार
आण्णा फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांचा इशारा



सांगली : खरा पंचनामा

सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग दहा  हा नागरी समस्याने ग्रासला आहे. या भागातील रस्ते, गटारी आणि ड्रेनेजीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या भागातील नागरिक कमालीचे अस्वस्थ आहेत. या भागातील या नागरी समस्याबाबत आपण तातडीने कार्यवाही केली नाही, तर महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी दिला आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग १० आणि विशेषतः सांगली कॉलेज कॉर्नर परिसर भागातील अनेक नागरी समस्या बाबत अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी आवाज उठवला आहे. या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवस नागरिक समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. वरद हॉस्पिटल समोरुन जाणारा चांगला रस्ता भुयारी गॅस लाईन पाईपलाईनसाठी संबंधित  कंपनीनीने  पावसाळी हंगामात खोदला. मात्र आपले काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीची असताना केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे.

या रस्त्यावरून नागरिकांना चालत जाणे मुश्कील झाले आहे.त्यामुळे वाहन घेऊन जाणे म्हणजे जीवावर उदार होण्यासारखे आहे. याभागात ड्रेनेजचे कामही गेली अनेक वर्षे अर्धवट आहे. मुख्य रस्त्याला ड्रेनेजचे खोदकाम  झाले. मात्र नागरिकांच्या घरांच्या  जोडण्याचे काम अद्याप अपुरे आहे. काही नागरिकांनी मलमुत्र थेट या पाइपलाइनमध्ये सोडल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पूर्णपणे वितरण करणारी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. 

या भागातील या नागरी समस्या बाबत आयुक्त म्हणून आपण तातडीने लक्ष घालून या समस्या सोडवाव्यात. अन्यथा पंधरा दिवसानंतर सांगली महापालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.