Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी विशेष प्रयत्न विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती

ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी विशेष प्रयत्न
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहितीमिरज : खरा पंचनामा

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुण्यासह राज्यात सोशल मिडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सांगली पोलिसांनी गेल्या महिनाभरात फसवणूक झालेल्या लोकांची २० कोटींची रक्कम गोठवली आहे. सामान्य नागरिकांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष प्रयत्न केले जात आहेत. सायबर शाखेतील लोकांना आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवीन हार्डवेअर, सॉफ्टवेअर आम्ही घेत आहोत. नागरिकांनाही फेक कॉल, मेसेज याला बळी न पडता सजग होण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी व्यक्त केले. 


श्री. फुलारी मंगळवारी मिरजेत एका कायर्क्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ऑनलाईन फसवणुकीबाबत मते व्यक्त केली. गेल्या महिन्याभरात इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मिडियाद्वारे फसवणूक करणाऱ्या लोकांच्या खात्यावरील तब्बल २० कोटींची रक्कम गोठवण्यात आली आहे. अलिकडे आनलाईन फसवणुकीचे फंडे वाढत आहेत. यासाठी नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. शिवाय पोलिस दलही यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे श्री. फुलारी म्हणाले. 

अशी फसवणूक टाळण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशील आहे. आम्ही नागरिकांचे प्रबोधन करत आहे. शिवाय असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस दल नवीन हार्डवेअर, सॉफ्टवेअर घेत आहे. सायबर विभागात काम करणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु नागरिकांनाही जागृत राहणे गरजेचे आहे. पोलिस तसेच अन्य एजन्सीच्या नावे फोन, मेसेज करून फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणतीही खात्री केल्याशिवाय नागरिकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये, असेही फुलारी म्हणाले.  

दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कारण अलिकडे सोशल मिडियाचे युजर वाढत आहेत. हे युजर वाढतील तसे असे प्रकार वाढत जाणार आहेत. पोलिसांकडून याबाबत काळजी घेतली जात आहे. शाळा, महाविद्यालयात पोलिसांकडून प्रशिक्षण, प्रबोधन केले जात आहे. जर अशा प्रकारे फसवणुक झाल्याचे समजल्यास तातडीने सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. फुलारी यांनी यावेळी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.