Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची अशीही सहृदयता! विद्याथिर्नींना दिला यशाचा मंत्र

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची अशीही सहृदयता!
विद्याथिर्नींना दिला यशाचा मंत्र



मिरज : खरा पंचनामा

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी मंगळवारी मिरजेच्या दौऱ्यावर होते. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थी संघटना तसेच स्कुलतर्फे आयोजित संयुक्त कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कुलच्या तसेच महापालिकेच्या विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी राख्या आणि पोस्टकार्ड वितरण कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी महानिरीक्षक श्री. फुलारी यांची सहृदयता दिसून आली. शिवाय त्यांनी विद्यार्थिनीसाठी केलेल्या करिअरबाबतच्या मार्गदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना त्यांनी दिलेल्या यशाच्या मंत्राने त्या भारावून गेल्या. 

मिरजेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील कार्यक्रम आशादीप विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांना बनवलेल्या राख्या शाळेतील विद्यार्थिनींनी श्री. फुलारी यांच्यासह पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह प्रमुख पाहुण्यांना बांधल्या. यावेळी श्री. फुलारी यांनी आशादीप विशेष शाळेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर या मुलांसाठीची आर्थिक मदतही त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सतनामकौर चढ्ढा यांच्याकडे सुपूर्द केली. 

यावेळी त्यांनी देशासाठी शहीद झालेले पोलिस आणि लष्करातील जवान, अधिकारी यांच्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. पूर्वी देशाची आंतरिक सुरक्षा सांभाळणारे पोलिस मोठ्या प्रमाणात शहीद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी लष्कराप्रमाणेच पोलिसही कर्तव्य बजावताना शहीद होतात असे सांगितले. त्याशिवाय मुली, तरूणींसाठी पोलिस दलात मोठ्या संधी असून मुलींनी पोलिस दलात यावे आणि चांगले करिअर बनवावे असे आवाहनही केले. 

यावेळी श्री. फुलारी यांनी विशेष मुलांच्या शाळेला उत्स्फूर्तपणे केलेली मदत त्यांची सहृदयता दिसून आली. शिवाय त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाने विद्यार्थिनींना यशाचा मंत्रही दिला. त्यांनी पोलिस दलात येण्याचे आवाहन करताच उपस्थित सर्वच विद्याथिर्नीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.