Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाळव्यातील तौसिफ शेख टोळी दोन वषार्साठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

वाळव्यातील तौसिफ शेख टोळी दोन वषार्साठी तीन जिल्ह्यातून हद्दपारसांगली : खरा पंचनामा

वाळवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार तौसिफ शेख याच्यासह दोघांना सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी त्यांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. 

तौसिफ ऊर्फ मामू नजीर शेख (वय २८, रा. कोटभाग, वाळवा), शेरूभैय्या मन्सूर चाऊस (वय २६, रा. माळभाग, वाळवा) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर २०१७ ते २०२३ या काळात संगनमत करून खुनाचा कट रचून पुरावा नष्ट करणे, घातक हत्यारानिशी खुनाचा प्रयत्न करणे, स्त्रियांचा पाठलाग करून विनयभंग, बदनामी करणे, शिवीगाळी, दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही टोळी कायद्याला न जुमानणारी असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे आष्टा पोलिसांनी या टोळीविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव इस्लामपूरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला होता. श्री. चव्हाण यांचा चौकशी अहवाल, टोळीविरोधात दाखल असलेले गुन्हे, सध्यस्थितीचा अहवाल विचारात घेऊन अधीक्षक डॉ. तेली यांनी सलग सुनावणी घेऊन दोघांनाही तीन जिल्ह्यातून दोन वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

आष्टाच्या प्रभारी, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक मनिषा कदम, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, दीपक भोसले, योगेश जाधव यांनी या कारवाईत भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.