Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ७६ पोलिसांना पदके जाहीर! तिघांना राष्ट्रपती पोलिस पदक

राज्यातील ७६ पोलिसांना पदके जाहीर!
तिघांना राष्ट्रपती पोलिस पदकमुंबई : खरा पंचनामा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस सेवेत उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. देशभरातील एकूण ९५४ जणांना ही पदके जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ७६ जणांना पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. तर तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सोमवारी पदक प्राप्त पोलिसांचे नावे जाहीर केली आहेत. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित ७६ जणांपैकी ३३ जणांना पोलिस शौर्य पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४० जणांना पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. 

जीवन, मालमत्तांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद तसेच गुन्हेगारांना तातडीने अटक आदी कार्यासाठी राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक देण्यात येते. तर पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात येते. राज्यातील ३३ जणांना पोलिस शौर्य पदक तर ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.