Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादीमध्ये फूट नाही; अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते!

राष्ट्रवादीमध्ये फूट नाही; अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते!



पुणे : खरा पंचनामा 

अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये  सामील होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर काही नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही पवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि अजित आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. पक्षातील काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलेली आहे. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र शरद पवार हेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले

अजित पवार यांचं पक्षातील सध्याच स्थान काय? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतली आहे. त्याची तक्रार आम्ही महाराष्ट्र विधानसभेत अध्यक्षांकडे केली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत.

आमच्या पक्षाची भाजपशी कुठलीही युती किंवा आघाडी नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतल्याचे आमच्या लक्षात आलं, तेव्हा प्रक्रियेनुसार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचं म्हणणं सादर केलं आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये संभ्रम नाही. आम्ही कुठलीही गुप्त बैठक घेतलेली नाही. पवार आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्माआधीपासून मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात कसली चोरी, असा प्रश्न त्यांनी विचारला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.