जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील!
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या संदर्भात पाटील यांनीही या फक्त अफवा असल्याचे सांगितले होते.
आता पुन्हा एकदा जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सूचक इशारा सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी दिला आहे. एका कार्याक्रमात बोलताना संजय पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
मिरज येथे एका कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी हा सूचक इशारा दिला. संजय पाटील म्हणाले, जयंत पाटील आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जात आहेत की, भाजपमध्ये येत आहेत ते आता बघू. निशिकांत पाटील या होकायंत्राने आता आपल्याला इशारा दिला आहे, असं वक्तव्य करत संजय पाटील यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट- सुटल चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना ईडीची नोटीस आली होती. या नोटीसीनंतर या चर्चा सुरू झाल्या. या संदर्भात स्वत: जयंत पाटील यांनी माध्यमांना मी पक्ष सोडार नसून या सर्व अफवा असल्याची प्रतिक्रीया दिली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
