Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार!

महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार!





मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे.

प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. दुसरीकडे भाजपच्याही गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही कामाला लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. हे शिष्टमंडळ मुंबईतील आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.