Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत दुचाकी चोरट्यास अटक

मिरजेत दुचाकी चोरट्यास अटक



मिरज : खरा पंचनामा

मिरज शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.

दीपक शिवाजी केंगार (वय 32, रा. सावळी, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांनी चोरीतील संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्त घालत होते.

मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ एक तरुण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

उपअधीक्षक गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, धनंजय चव्हाण, सूरज पाटील, प्रवीण हुक्कीरे, जावेद शेख, विनोद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.