Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी धनुष्य बाण चिन्ह का काढले?

नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी धनुष्य बाण चिन्ह का काढले?मुंबई : खरा पंचनामा

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. त्यांच्या निधनावर सर्वच जणांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आता नवनवीन खुलासे होत आहे. अशातच, मोठी माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये धनुष्यबाण प्रतिकृती तयार करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याआधी एक छोटी नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या पार्थिवावर एनडी स्टुडिओच्या जागेवर अंत्यविधी करण्यात यावा, असं लिहिलं आहे. यातून त्यांचा एनडी स्टुडिओमध्ये किती जीव गुंतला होता, हे स्पष्ट होतंय. नितीन देसाई यांचा कर्जतला मोठा स्टुडिओ होता. पण कोरोना काळापासून ते आर्थिक विवंचनेत होते. ते कर्जबाजारी होते. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांनी गळफास घेण्यापूर्वी जमिनीवर दोरीच्या साहाय्याने एक धनुष्यबाणाची प्रतिकृती बनवली होती. या धनुष्यबाणात बाणाचं टोक असलेल्या ठिकाणच्या अगदी वर त्यांनी गळफास घेतलाय. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या धनुष्यबाणाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी एका साऊंड रेकॉर्डरमध्ये काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत. तो साऊंड रेकॉर्डर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.