Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील एपीआयचा सांगोल्यात खून! सूरज चंदनशिवे वारणानगर 9 कोटी चोरी प्रकरणात होते संशयित

सांगलीतील एपीआयचा सांगोल्यात खून!
सूरज चंदनशिवे वारणानगर 9 कोटी चोरी प्रकरणात होते संशयितसोलापूर : खरा पंचनामा

सोलापुरातील सांगोला तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा खून करण्यात आला आहे. सूरज विष्णु चंदनशिवे असे मृत सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. चंदनशिवे सांगली पोलिस दलात कार्यरत होते. तर वारणानगर येथील 9 कोटी चोरी प्रकरणात ते संशयित होते.

चंदनशिवे यांचा खून कुणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनशिवे सुट्टीनिमित्त मूळगावी आले होते. रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी ते गेले होते मात्र घरी परतलेच नाहीत. यावेळी उसाच्या शेतात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात चंदनशिवे यांचा जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी चंदनशिवे घरी परतले नाहीत. घरच्यांनी त्यांना फोन लावला तर तो बंद होता. घरच्यांना काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास सांगोला- वासूद रस्त्याच्या लगत चंदनशिवे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.