Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेकायदा तलवार बाळगणाऱ्यास अटक सांगली एलसीबीची कारवाई

बेकायदा तलवार बाळगणाऱ्यास अटक
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा 

बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्याप्रकरणी एकाला एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

तलवार बाळगणाऱ्या यासीर शब्बीर मुजावर (वय ३०, रा. साईनाथ नगर, कर्नाळ रोड, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील सहायक निरिक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक गस्त घालत होते. 

एक तरुण शस्त्र विक्री करण्यासाठी झुलेलाल चौक ते शासकीय रुग्णालय या रस्त्यावरील एका वाईन शॉपनजीक थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेथे एका करमध्ये (एमएच ०९ एफजे १८८१) एक युवक बसलेला दिसला. त्याच्याकडे चौकशी करून वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना चालक सीटच्या खाली दोन तलवारी आढळून आल्या. पथकाने त्याला ताब्यात घेतले. ती कार संशयीत यासीर मुजावर याचा मेव्हणा आसीफ शब्बीर फरास (रा. कोल्हापूर ) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन तलवारीसह कार जप्त केली. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरिक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, अमर नरळे, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे यांनी केली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.