Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या तक्रारी

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात सर्वात जास्त भ्रष्टाचाराच्या तक्रारी



नवी दिल्ली : खरा पंचनामा

गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयानंतर रेल्वे आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात जास्त तक्रारी आल्या आहेत. रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या सर्व विभाग आणि संस्थांमधील सर्व कॅटेगरीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकूण १,१५,२०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

प्राप्त झालेल्या ८५,४३७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, उर्वरित २९,७६६ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यापैकी २२,०३४ तक्रारी तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीव्हीसीने तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

गृह मंत्रालयाच्या २३,९१९ तक्रारींचे निराकरण रिपोर्टनुसार, गृह मंत्रालयाला त्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध ४६,६४३ तक्रारी प्राप्त झाल्या, तर रेल्वेकडे १०,५८० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यां एकूण तक्रारींपैकी २३,९१९ निकाली काढण्यात आल्या आणि २२,७२४ प्रलंबित होत्या, त्यापैकी १९,१९८ तक्रारी तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होत्या, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रिपोर्टनुसार, रेल्वेने ९,६६३ तक्रारी निकाली व आहेत, तर ९१७ तक्रारी प्रलंबित आहेत, त्यापैकी ९ तक्रारी तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होत्या.

बँकांनी भ्रष्टाचाराच्या ७,७६२ तक्रारी निकाली काढल्या, ३६७ प्रलंबित होत्या, त्यापैकी ७८ तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तब्बल ७,३७० तक्रारी दाखल करण्यात आल्या, त्यापैकी ६,८०४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आणि ५६६ तक्रारी प्रलंबित होत्या, त्यापैकी १८ तक्रारी तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होत्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.