Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खून करून, गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकला!

खून करून, गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकला!पिंपरी : खरा पंचनामा

मद्यपान करत असताना मित्राने शिवीगाळ केल्याने त्याचा ब्लेडने सपासप वार करुन खून केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापून मृतदेह दगड बांधून एका विहिरीत फेकून दिला. त्यानंतर चोरी करताना खुनातील संशयित सापडल्यावर ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अभिषेक उर्फ डल्ल्या मसु गायकवाड (वय 20, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे (वय-18 रा. बौद्धनगर, पिंपरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

दोन्ही संशयित आणि मयत गणेश हे मित्र होते. बुधवारी मध्यरात्री चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मैदानात तिघे दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि याच वादातून गणेशने अभिषेकला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याच्या रागातून मद्यधुंद असलेल्या अभिषेक आणि अल्पवयीन मुलाने गणेशवर ब्लेडने आणि धारदार शस्त्राने वार करुन खून केला. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. पुरवा नष्ट करण्यासाठी त्यांनी गणेशचे कपडे काढून त्याला दगड बांधून विहीरीमध्ये फेकून दिले.

दरम्यान, अभिषेक आणि अल्पवयीन मुलगा हे सोसायटीमध्ये घरफोडी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी नागरिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा तपास करत असताना दोघा संशयितांनी त्यांच्या मित्राचा शनिवारी खून केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान बेपत्ता झालेल्या गणेशचा शोध त्याचे नातेवाईक घेत होते. चिंचवड येथील रेल्वे स्थानकाजवळ विहिरीत गणेशचा मृतदेह आढळला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.