मराठा आरक्षणाबाबत अजितदादा सकारात्मक : लवकरच मुंबईत बैठक
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक पार पडली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी अजितदादांनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट केले. शिवाय यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान या बैठकीला उशिरा आलेल्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी म्हणणे ऐकून घेतले.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरातील मराठा समाजाचे नेते यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीचं नियोजन केलं होते. या बैठकीला कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील मराठा समाजातील नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका छोट्या हॉलमध्ये निवडक नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक वेळेवर सुरू झाली.
या बैठकीत कोल्हापूर येथील बाबा इंदुलकर, सांगलीचे विलासराव देसाई यांच्यासह इतर जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी पवार यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. यावर पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. पवार यांनी संबंधित लोकांना तशा सूचनाही दिल्या.
दरम्यान काही कार्यकर्ते उशिरा आले. त्यांनी पवार यांच्याकडे बैठकीला पोलिसांनी येऊ न दिल्याची तक्रार केली. त्यानंतर पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांचेही म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना मुंबईत बैठकीला येण्यास सांगितले.
उशिरा आलेल्या कार्यकर्त्यांनी थोडा गोंधळ घातला मात्र ही बैठक सकारात्मक झाल्याचे बाबा इंदुलकर, विलासराव देसाई यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.