Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट रेल्वेत सिरीयल बॉंबस्फोटाची धमकी

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट
रेल्वेत सिरीयल बॉंबस्फोटाची धमकी



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट करण्यात येण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी  देण्यात आली होती.

आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी फोन करणाऱ्याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.

जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.