Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादा तुम्ही उशीर केला!

अजितदादा तुम्ही उशीर केला!पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यांचा सोबत माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार यांना एक सांगतो, दीर्घ कालावधीनंतर आपण योग्य ठिकाणी बसला आहेत. तुमची हीच जागा योग्य होती. मात्र आपण खूप उशीर केला. अमित शाह यांनी ही वक्तव्य करताच व्यासपीठावर बसलेले अजित पवार यांनी लागलीच प्रत्युत्तर दिले. आपले दोन्ही हात जोडून त्यांनी नमस्कार केला. यावेळी सभागृहात हशा आणि टाळ्या झाल्या.

गृहमंत्री अमित शाह यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या अंतरराजीय डिजिटल पोर्टलचे उद्घाटनकेले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे अमित शाह यांनी अजित पवार यांचा सुरुवातीलाच उद्घाटन करत ती आठवण करुन दिली.

अजित पवार यावी २०१९ मध्ये भाजपसोबत आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. या सर्व घडामोडींमागील चाणक्य अमित शाह असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु शरद पवार यांनी चक्र फिरवली अन् अजित पवार काही तासांत पुन्हा स्वगृही आले. तिच आठवण अमित शाह यांनी अजित पवार यांना तर करुन दिली नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे कौतूक केले. अमित शाह म्हणाले की, देश एका बाजूला आहे, अन महाराष्ट्र एका बाजूला. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलोय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.