Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कळंबा कारागृहात कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा

कळंबा कारागृहात कैद्यांकडे मिळाले चार मोबाइल, तीन कैद्यांवर गुन्हा



कोल्हापूर : खरा पंचनामा

कळंबा कारागृहातील कैद्यांकडील मोबाइलचा शोध घेण्यासाठी पुणे येथील कारागृह पोलिस मुख्यालयातील पथकाने आणि कळंबा कारागृहातील सुरक्षारक्षकांनी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस शोधमोहीम राबवली.

याबाबत तीन कैद्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अजय भानुदास कुलकर्णी, विद्यासागर उर्फ राजेश नामदेव चव्हाण आणि जमीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

कळंबा कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैदी मोबाइल लपवून आत प्रवेश करतात. काही वेळा कारागृहाच्या भिंतींवरून मोबाइल आत फेकले जातात. कैद्यांकडून मोबाइलचा वापर वाढला असून, कारागृहात बसून सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही गुन्हे घडविल्याचेही समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील कारागृह मुख्यालयातील पथकाने शनिवारी रात्री कळंबा कारागृहाची झडती घेतली.

यावेळी सर्कल क्रमांक पाचमधील बरॅक क्रमांक तीनच्या शौचालयात तीन मोबाइल सापडले. मोक्कातील कैदी अजय कुलकर्णी, विद्यासागर चव्हाण आणि जमीर शेख यांनी मोबाइल लपवून ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याबाबत कारागृह रक्षक भारत उत्तरेश्वर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तिघांवर गुन्हा करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.