Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळा!

संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळा!मुंबई : खरा पंचनामा

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. युक्रांत संघटनेचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महान पुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेक प्रकरणे आहेत. अशी अनेक प्रकरणे असताना फक्त संभाजी भिंडे यांच्याविरोधातच जनहित याचिका दाखल का? असा प्रश्न न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला आहे. जनहित याचिका केवळ एका व्यक्तीच्या विरोधात दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.

न्यायालयाने म्हटलं की, महान पुरुषांच्या संदर्भात काही अवमानकारक किंवा बदनामीकारक वक्तव्य येत असतील तर त्याविरोधात जनहित याचिका होऊ शकते, पण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जनहित याचिका होऊ शकत नाही, कारण ही जनहित याचिका आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

'महान व्यक्तींविरोधात वारंवार वादग्रस्त वक्तव्य येत असतील तर त्याला रोखण्यासाठी एखादा कायदा केला जावा. तसेच आयपीसीमधील मानहानीची कलमे 499 आणि 500 यांचा उपयोग होणार नसेल तर ती रद्द करण्यात यावीत, असं युक्रांतचे कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.