Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील ओला-उबेर चालकाचे अपहरण : सांगलीतील 6 जणांना अटक

पुण्यातील ओला-उबेर चालकाचे अपहरण : सांगलीतील 6 जणांना अटकपुणे : खरा पंचनामा

25 लाख रुपयांच्या व्यवहारावरुन कोंढवे धावडे येथून एका ओला उबेर चालकाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने सांगली येथून या चालकाची सुटका करत 6 जणांना अटक केली आहे.

अक्षय मोहन पाटील (वय 28, रा. टंच सेंटर, नेपाळ, मुळ रा. घोटी खुर्द, ता. खानापूर, जि. सांगली), सुशांत मधुकर नलावडे (वय 28, रा. तळेवस्ती, ता. खानापूर, जि. सांगली), महेश मलिक नलावडे (वय 25), बोक्या ऊर्फ रणजित दिनकर भोसले ( रा. तासगाव, जि. सांगली), प्रदीप किसन चव्हाण (वय 26, रा. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली) आणि अमोल उत्तम मोरे (वय 32, रा. बिरणवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चालक वैभव श्रीकृष्ण जाधव (वय 27, रा. स्वामी चैतन्य बिल्डिग, खडकवस्ती, कोंढवे धावडे) याचे अपहरण करण्यात आले होते.

याबाबत पूनम वैभव जाधव (वय 26) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील स्वामी चैतन्य बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री आठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडला. वैभव जाधव हे ओला उबेर चालक आहेत. अक्षय पाटील हा दिल्ली येथे सोन्या चांदीचा व्यवसाय करतो. 2021-22 मध्ये वैभव जाधव हे अक्षय पाटीलकडे कामाला गेले होते. दिल्ली येथे त्यांच्यात 25 लाख रुपयांच्या व्यवहारावरुन वाद झाला होता. नंतर ते कामावरुन परत घोटी बुदुक येथे आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील पैशांचा वाद मिटला होता.

पूनम या 4 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता घरात असताना अक्षय पाटील  दोघांना घेऊन त्यांच्या घरात शिरला. त्यांनी वैभव कोठे आहे, विचारून त्यांना धमकावले. इतर दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे त्यांना सांगून वैभवला बोलावण्यास सांगितले  साडेनऊच्या सुमारास वैभव घरी आल्यावर त्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये घालून पळवून नेले.

खंडणी विरोधी पथकाच्या दोन्ही युनिटने या अपहरणकर्त्यांचा माग काढून सांगलीमधून वैभव जाधव याची सुटका केली. 6 जणांना अटक केली असून त्यांना पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.