Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संभाजी भिडेंच्या उपस्थितीत उद्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा!

संभाजी भिडेंच्या उपस्थितीत उद्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा!



सांगली : खरा पंचनामा

शिवप्रतिष्ठान हिंदस्थानच्यावतीने काढण्यात येणा-या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेला सांगली शहर पोलिसांनी अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. या पदयात्रेत संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे हे सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगली शहरातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेस परवानगी देताना पोलिसांनी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

ही पदयात्रा सकाळी 9 वाजता सुरु होईल. या पदयात्रेत संभाजी भिडे यांचीही उपस्थिती असणार आहे. पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.