भाजपसोबत गेलेल्यांशी आमचा काहीही संबंध नाही!
बारामती : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून संभ्रम तयार करू नका, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. सोमवारी ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपसंबंधी आमची भूमिका देश व राज्य पातळीवर स्पष्ट आहे. भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही.
महाविकास आघाडीची बैठक मुंबईत ३१ आँगस्ट रोजी आहे. दि. १ रोजी इंडियाची हयात हॉटेलमध्ये बैठक आहे. त्याची जबाबदारी माझ्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. आम्ही ती उत्तमरितीने आयोजित करू. या बैठकीला काँग्रेसमधून कोण हजर राहणार हे माहित नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासंबंधी मविआमध्ये अद्याप काहीही चर्चा झालेली नसल्याचे पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.