त्यामुळेच पोलिस अधिकारी राहिले पदकांपासून वंचित!
मुंबई : खरा पंचनामा
२०२२ च्या उत्कृष्ट तपासाचे राज्य गुन्हे शाखेकडे ६७ प्रस्ताव आले. यांपैकी ४८ तपासी अंमलदाराच्या व्हीसीद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. यातून ११ पदकांसाठी २२ जणांची शिफारस मे २०२३ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही मुद्द्यांवर अधिक माहिती मागत सुधारित प्रस्ताव १५ जुलैपर्यंत पाठविण्यासाठी राज्याकडे परत केले. मात्र गृहविभागाने त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव परत पाठवलाच नाही. यामुळे अधिकारी पदकांपासून वंचित राहिले.
पदकास पात्र तपास अधिकाऱ्यांवरील अन्यायाचे निवारण कसे होणार हा प्रश्न आहे. पदके जाहीर होण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने शासनाने तातडीने हालचाली केल्यास पदके अजूनही जाहीर होतील अशी आशा पात्र अधिकाऱ्यांना आहे.
दरम्यान पदकांची यादी जाहीर होताच गृह विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. गृहमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना गुन्हे विभागाला दिले आहेत. त्यामुळे आज केंद्रीय गृह विभागाकडून आणखी एक यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
