Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारागृह महिला पोलिसाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न : कोल्हापूरच्या जेलरला अटक

कारागृह महिला पोलिसाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न : कोल्हापूरच्या जेलरला अटक



पुणे : खरा पंचनामा 

एकतर्फी प्रेम व्यक्त करुन कारागृह महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जेलरने महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वरिष्ठ जेलरला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ जेलर योगेश भास्करराव पाटील  (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करतात. योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे.

पाटील फिर्यादी यांना वारंवार फोन करुन तो गुन्हा मागे घे व माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असे बोलत असे. 

सोमवारी साडेनऊच्या सुमारास फिर्याद घरी येत असताना त्याने फिर्यादी यांना गाठले. मला माहिती आहे तू भाड्याचे घरात राहतेस. आधीच तुझ्या इज्जतीची थु थु झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत. असे बोलून तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादीचे घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला. काही वेळाने परत हातामध्ये प्लॅस्टिकचे बाटलीत पेट्रोल घेऊन आला. 

तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून काड्याची पेटी काढून तिने पेटविण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला धक्का देऊन आतील खोलीत जाऊन दरवाजा लावून घेऊन स्वत:चा जीव वाचविला. पोलिसांनी या जेलरला अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.