Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील 39 एएसआय झाले पीएसआय! 4 हवालदार झाले एएसआय

सांगलीतील 39 एएसआय झाले पीएसआय! 
4 हवालदार झाले एएसआय सांगली : खरा पंचनामा 

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सांगलीतील पोलिस अमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 39 एएसआय आता पीएसआय (श्रेणी) बनले आहेत. तर 4 हवालदारांना एएसआय पदोन्नती देण्यात आली आहे. तर 6 जणांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. 

पोलिस दलात 30 वर्षे सेवा पूर्ण झालेले तसेच एएसआय म्हणून 3 वर्षे पूर्ण केलेल्यांना पीएसआय (श्रेणी) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 39 जणांचा समावेश आहे. एलसीबीचे सिध्दाप्पा रुपनर, सांगली ग्रामीणचे बाळकृष्ण गायकवाड, रामराव पाटील, कुपवाड एमआयडीसीचे श्रीपाद बोन्द्रे, संजयनगरचे महादेव माळी आदींना पीएसआय (श्रेणी) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. 

4 पोलीस हवालदार यांना एएसआयपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये एलसीबीचे अरुण औताडे यांचा समावेश आहे. 6 जणांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 2 पोलिस शिपाई, 4 पोलिस नाईक यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.