Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केरळ राज्याचे नाव बदलले!

केरळ राज्याचे नाव बदलले!तिरुवंतपुरम : खरा पंचनामा

केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' (Keralam) करण्याची ठराव आज बुधवारी विधानसभेत एकमताने मजूर करण्यात आला. यासंदर्भातील ठराव मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडला.

केरळ राज्याचे नाव बदलून केरळम करावे, असा ठराव काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने कोणत्याही सुधारणा किंवा बदल न सुचवता स्वीकारला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमसीर यांनी आवाजी मताने विधानसभेने एकमताने हा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

राज्याचे नाव बदलाचा ठराव मांडताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्याला मल्याळम भाषेमध्ये 'केरळम' असे म्हटलं जाते. तर इतर भाषांमध्ये केरळ असे संभोधित करतात. मल्याळम भाषिक समुदायांसाठी संयुक्त केरळमची गरज राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळापासून प्रकर्षाने निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळचे नाव नमूद करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.