Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नास विरोध करणाऱ्या पित्याचे पाय तोडण्याची मुलीकडून सुपारी; सहा जण अटकेत

लग्नास विरोध करणाऱ्या पित्याचे पाय तोडण्याची मुलीकडून सुपारी; सहा जण अटकेत माढा : खरा पंचनामा 

पळून जाऊन लग्न करण्यास विरोध होईल. त्यांचे पाय तोडले तर त्यांचा अडथळा येणार नाही, असे म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचे पाय तोडण्याचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी तिचा प्रियकर यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. 

मुलगी साक्षी शहा पुण्याला दुकानाचे साहित्य आणायला गेली होती. सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसने शेटफळ (ता. माढा) येथे आली. तेथून आणण्यासाठी वडील महेंद्र शहा कार घेऊन गेले होते. रस्त्यात वडाचीवाडीजवळ लघुशंकेचे निमित्त करून साक्षीने गाडी थांबवण्यास सांगितले. 

मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी महेंद्र यांच्या पायावर मारायला सुरुवात केली. त्यातील एकास महेंद्र यांनी पकडले असता दुसऱ्याने त्यांच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले. शहा यांना वडाचीवाडीचे उपसरपंच बापू काळे व रामचरण डोंगरे यांनी उपचारासाठी हलवले. या प्रकरणी सहा जणांवर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. सहाही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 

मुलगी साक्षी शहा तिचा प्रियकर चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयुर चंदनशिवे, राम पवार, आनंद उर्फ बंड्या जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. माढा शहरातील व्यापारी महेंद्र शहा यांच्यावर माढा शेटफळ मार्गावरील वडाचीवाडी गावाजवळ चार जणांनी हल्ला करुन जबर मारहाण केली होती. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. माढ्यातून सोलापूरला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. घटना समजताच माढा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवराम बोटे, एस. एस. घोळवे, शब्बीर शेख यांनी तत्परतेने घटना स्थळी जाऊन मुलगी साक्षीला घटना विचारली असता तिने उपस्थितांना व माढा पोलिसांना हकीकत सांगितली. 

मात्र चौकशीसाठी माढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बि. एस. खणदाळे यांनी घेतले असता त्यांनाही व्यवस्थित उत्तरे न देता साक्षी घूमजाव करीत दिशाभूल करीत होती. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच साक्षी व तिचा प्रियकर चैतन्य याने गुन्ह्याची कबूली दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.