Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळजवळ स्कूल बस उलटून पाच विद्यार्थी जखमी चालक, संस्थेचा अध्यक्ष, सचिवावरही गुन्हा दाखल

कवठेमहांकाळजवळ स्कूल बस उलटून पाच विद्यार्थी जखमी
चालक, संस्थेचा अध्यक्ष, सचिवावरही गुन्हा दाखलसांगली : खरा पंचनामा

कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव (लांडगेवाडी) येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर स्कूल बस उलटून झालेल्या अपघातात आनंदसागर पब्लिक स्कूलचे ५ विद्यार्थी जखमी झाले. मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बसचा चालक मोबाईलवर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी बस चालक, शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, सचिवासह चौघांवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

तुषार विठ्ठल माळी (वय ३०, रा. देशिंग), आनंदसागर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय आण्णासाहेब पाटील, सचिव राजेंद्र आण्णासाहेब पाटील, अभिजित शिंदे (सर्व रा. तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

मंगळवारी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी १६ विद्यार्थी स्कूल बसमधून (एमएच १२ एफसी ९११३) शाळेकडे निघाले होते. ही बस तुषार माळी चालवत होते. नरसिंहगाव येथे आल्यानंतर चालक मोबाईलवर बोलत असताना बस उलटली. यामध्ये पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यातील दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात हलवले. 

दरम्यान बेकायदेशीर, विना परवाना बस चालवण्यास देऊन विद्याथ्यार्च्या जिवितास, सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी कृती केल्याने संस्थेचे अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय बसचे सर्व प्रकारचे परवाने संपलेले असल्याचेही निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ पवार अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.