Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संपूर्ण मंत्रिमंडळाला ताजमध्ये डिनर! सपत्नीक आमंत्रण

संपूर्ण मंत्रिमंडळाला ताजमध्ये डिनर!
सपत्नीक आमंत्रण



मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे उद्या संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे.

अजित पवार गट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाला, त्यानंतर हे पहिलंच स्नेहभोजन पार पडणार आहे. त्याचबरोबर या स्नेहभोजनाच्या निमीत्ताने मंत्रिमंडळातील समन्वय संदर्भात चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. यासंबधीच्या निमत्रण पत्रिका देण्यात आल्या आहे. उद्या संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या सरकारमध्ये सामिल होण्यामुळे शिंदे गटाचे आमदार, नेते, मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पुर्णविराम देण्यासाठी या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.