Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार!

निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपमध्ये प्रवेश करणार!



मुंबई : खरा पंचनामा

निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर हे आता आपल्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहेत. प्रताप दिघावकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते राजकारणात येत आहेत. दिघावकर हे मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश आहेत.

प्रताप दिघावकर हे काही महिन्यांपूर्वीच पोलीस दलातून निवृत्त झाले होते. त्यानंतर आता ते राजकारणात एन्ट्री करत आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दिघावकर यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपास पथकातील एक महत्त्वाचे अधिकारी होते. सध्या ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य आहेत. प्रताप दिघावकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस अधीक्षक पदावर देखील काम केले आहे. याशिवाय नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.