Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाहतूकोंडीच्यावेळी पोलिसांची घोळका कारवाई; तिघा पोलीस हवालदारांचे निलंबन

वाहतूकोंडीच्यावेळी पोलिसांची घोळका कारवाई; तिघा पोलीस हवालदारांचे निलंबनपुणे : खरा पंचनामा

पुणे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले असतानाच कोंडीच्या वेळी पोलीस मात्र वाहतूक नियमन सोडून घोळक्याने एकत्रित येत कारवाई करत असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपुर्वी डेक्क्कन भागात वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर उपायुक्तांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत डेक्कन वाहतूक विभागातील तिघा पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. 

जितेंद्र दत्तात्रय भागवत, जयशिंग यशवंत बोराणे, गोरख मारुती शिंदे (सर्व, नेमणूक डेक्कन वाहतूक) अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस हवालदारांची नावे आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी हे आदेश दिले.

शनिवारी पोलिस उपायुक्त मगर हे जंगली महाराज रोडवर होते. त्यावेळी प्रभात रस्त्यावरील हॉटेल रॉयल्टी व त्यापुढे वाहतूक कोंडी झाली असून, दोन्ही बाजूने वाहने लागलेली आहेत. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली असून तत्काळ कारवाई करून वाहतूक सुरळीत करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. कंट्रोलवरून डेक्कन वाहतूक विभागाला याची माहिती मिळाली. तसेच टेम्पो आणि क्रेन ऑपरेटरला देखील सांगण्यात आले. दरम्यान पोलिस उपायुक्त मगर हे लॉ कॉलेज रोडने भांडारकर रोडकडे जात असताना हे तिघे हवालदार वाहतूक कोंडी फोडायची सोडून एकत्र कारवाई करताना आढळून आले.

नेमणूक असलेल्या भागात कोंडी असल्यास नियमनाला प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत. तरीदेखील वाहतूक पोलीस गर्दीच्या वेळी (पीक अव्हर्स) नियमन सोडून कारवाईत दंग असतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होवून सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक नियमन हे प्रथम कर्तव्य असताना सुद्धा हे तिघे एकत्र कारवाई करताना दिसले. तर एका कर्मचाऱ्याने उपायुक्तांची गाडी पाहून धुम ठोकली. तिघांनी केलेले वर्तन हे बेशिस्त बेजबाबदारपनाचे असल्याचा ठपका ठेवत तिघांनी निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.