सांगलीतील या गावात आता नेत्यांना नो एंट्री, निवडणुकांवरही बहिष्कार!
सांगली : खरा पंचनामा
मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दयावर ठाम असून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही; अशी भूमिका घेतली आहे. यात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव गावाने ऐतिहासिक निर्णय घेत नेत्यांना नो एन्ट्री केली असून सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोर्चा, आंदोलन, गाव बंद ठेवण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव येथील संपुर्ण गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. धनगावमधील युवा वर्गाने मात्र निर्णायक पाऊल टाकले आहे. संयम आता संपल्याचे सांगत सत्तेला मतदार राजाची किंमत दाखवून देण्यासाठी धनगावमध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
धनगावच्या शिवतिर्थावर याबाबतचे निवेदन सकल मराठा तरूणांच्यावतीने सरपंच यांना देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणास पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.