अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना यांनी घेतली जरांगे यांची भेट
जालना : खरा पंचनामा
अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज व दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेचा याचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जावून भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच लाठीचार्जसाठी दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.
दरम्यान सक्सेना यांनी डॉक्टरांकडून जरांगे यांच्या तब्येतीची माहिती घेतली. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले. ते मुद्दे चौकशी दरम्यान तपासले जातील, असं सांगताना मनोज जरांगे यांच्यासह गावकऱ्यांशी चर्चा केली संजय सक्सेना यांनी म्हटलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.