Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गिरगाव येथे गोवा बनावटीची दारू जप्त, २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांच्या भरारी पथकाची कारवाई

गिरगाव येथे गोवा बनावटीची दारू जप्त, २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्तांच्या भरारी पथकाची कारवाईकोल्हापूर : खरा पंचनामा

करवीर तालुक्यातील नंदगाव-गिरगाव रस्त्यावर गिरवाग येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करून गोवा बनावटीची दारू, एक आलिशान जीप एसा २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूर विभागीय उपायुक्तांच्या भरारी पथकाने रविवारी ही कारवाई केली. 

गजानन पाटील (वय ४७, रा. रूईकर कॉलनी, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याने भरारी पथक अलर्ट मोडवर होते. रविवारी गोवा बनावटीची दारू घेऊन एक आलीशान जीप (जीए ०३ वाय १३६३) येणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांच्या पथकाने नंदगाव-गिरगाव रस्त्यावर सापळा रचला होता. 

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आलेली जीप पथकाने अडवली. जीपची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या १८० मिलीच्या १२४८ बाटल्या, ७५० मिलीच्या ३२४ बाटल्या, २००० मिलीच्या १२ बाटल्या असे एकूण ५५ बॉक्स सापडले. त्यानंतर पथकाने पाटील याला अटक करून दारूच्या बाटल्या आणि जीप असा २४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, आर. जी. येवलुजे, विलास पवार, सुशांत बनसोडे, अमोल यादव, योगेश शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.