Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

‘तांबट’ला मागे सोडत ‘दयाळ’ आता सांगलीचा पक्षी! सांगलीकरांचा निवडणुकीत कौल

‘तांबट’ला मागे सोडत ‘दयाळ’ आत सांगलीचा पक्षी!
सांगलीकरांचा निवडणुकीत कौल



सांगली : खरा पंचनामा

गेल्या महिन्यातील प्रत्येक रविवारी सांगलीकरांची पक्षी निरीक्षणांसाठी आणि मतदानासाठी गर्दी व्हायची. प्रत्यक्ष पक्षी पाहून सांगली शहराच्या पक्ष्यासाठी मतदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. पाच उमेदवार पक्षी रिंगणात होते. आज मतमोजणीवेळी तांबट आणि दयाळ या दोन पक्ष्यांत चुरस होती. अखेर दयाळ पक्ष्याने ‘सांगली शहराचा पक्षी’ होण्याचा मान मिळवला. शहर पक्षी निवडणूकीनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.


येत्या २३ व २४ डिसेंबरला येथे होणाऱ्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलनानिमित्त सांगली शहराचा पक्षी निवडण्यासाठी चार रविवारी मतदान घेण्यात आले. तांबट, शिक्रा/ससाणा, हळदी-कुंकू बदक, भारतीय राखी धनेश, दयाळ असे पाच उमेदावर पक्षी रिंगणात होते. दहा ठिकाणी प्रत्यक्ष पक्षीनिरीक्षन करत सांगलीकरांनी आवडत्या पक्ष्याला मतदान केले. तांबट आणि दयाळ या दोन्ही पक्ष्यात चुरस होती. तांबट पक्ष्याला ५५७ तर दयाळ पक्ष्याला ५६१ मते मिळाली. दयाळ हा आता सांगलीचा पक्षी असेल, असे निवड समितीचे अध्यक्ष डॉ. नयना पाटील यांनी जाहीर केले. सहायक आयुक्त सहदेव कावडे हे मोजणी निरीक्षक होते. ही निवड दहा वर्षांसाठी असणारा आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यात सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांनी विशेष सहकार्य केले. पक्षीतज्ज्ञ शरद आपटे, डॉ नंदिनी पाटील, श्रीकृष्ण कोरे, विश्‍वनाथ माडोळी, विजय सावदी, डॉ. संतोष आफळे, मंजूषा पाटील, सकाळचे पत्रकार शैलेश पेटकर, सचीन शिंगारे, डॉ. वैजयंती आफळे, समीर म्हेत्रास, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, फिरोज तांबोळी, संजय अष्टेकर, अंशुमन नामजोशी, डॉ गीतांजली गुप्ते व बर्ड सॉगच्या सदस्यांचा सहभाग होता.

कोणाला किती मते : तांबट (Copersmith Barbet) - ५५७, शिक्रा/ससाणा (Shikra) - ३७८, हळदी-कुंकू बदक (Spot-Billed Duck) - २७५, भारतीय राखी धनेश (Indian Grey Hornbill) - ३५६, दयाळ (Oriental Magpie- Robin) - ५६१, बाद मते - १३, एकुण मते - २१४०.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.