Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादा गटाला ट्विटरचा धक्का, ट्विटरकडून मोठी कारवाई!

अजितदादा गटाला ट्विटरचा धक्का, ट्विटरकडून मोठी कारवाई!पुणे : खरा पंचनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर सवतासुभा मांडला आहे. राष्ट्रवादीत दोन पडल्यानंतर दोन्ही गटाकडून पक्षावर दावा सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अजितदादा गटाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर आता शरद पवार गटानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपलं म्हणणं मांडलं आहे. पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही आघाडीत दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू असतानाच अजितदादा गटाला ट्विटरचा मोठा दणका बसला आहे. ट्विटरने अजितदादा गटावर कुरघोडी केली आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटरचे नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. अनेक जणांनी या अकाऊंटला विविध ट्विटमधून टॅग देखील केले होते. मात्र हे अकाऊंट आता ट्विटरने सस्पेंड केल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या ट्विटर अकाऊंट @NCPSpeaks हे अॅक्टिव आहे.

शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर आणि तक्रारीनंतर ते निलंबित करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर अजित पवार गटाने ट्विटरला मेल केलाय, या मेलमध्ये आपली भूमिका मांडली आहे. लवकरच त्यांचे हँडल पुन्हा सक्रिय होईल, अशी अजित पवार गटाला आशा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.