Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नामांकित शैक्षणिक संस्थेत कोट्यावधींचा अपहार; डॉक्टरला कोल्हापुरात अटक!

नामांकित शैक्षणिक संस्थेत कोट्यावधींचा अपहार; डॉक्टरला कोल्हापुरात अटक!



पुणे : खरा पंचनामा

सातारा येथील शैक्षणिक संस्थेची यापूर्वीच विक्री झाली असताना, पुण्यातील अरणेश्वर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना 2021-22 दरम्यान ही संस्था विकत द्यायची आहे सांगून विश्वास संपादन करुन 70 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच आरोपीने संस्थेचा ताबा आपल्याकडेच असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे तयार करुन कोणताही परतावा न देता कोट्यवधींची फसवणूक केली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने एका डॉक्टरला कोल्हापूर येथून अटक केली आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात 20 जुलै 2023 रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी डॉ. संजोग महादेव देशमुख (वय 28, रा. शिवाजी पार्क, कोल्हापूर मुळ रा. शिंदेवाडी रोड, ता. खटाव जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती व स्वरुप मोठे असल्याने याचा तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडे वर्ग करण्यात आला होता. पथकाने गुन्ह्याचा तपास करुन आरोपी डॉ. संजोग देशमुख याला सोमवारी अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.