Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजपच्या तिकीटावर लढणार!

अजितदादा आणि एकनाथ शिंदे भाजपच्या तिकीटावर लढणार!मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भविष्य वर्तवलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर या दोन नेत्यांचं काय होणार? भाजप त्यांचं काय करणार? याची भविष्यवाणीच रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. रोहित पवार यांच्या या भविष्यवाणी मागचा आधार काय हे शोधून काढलं जात आहे. रोहित पवार हे मीडियाशी संवाद साधत होते.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केला जात आहे. दुसरीकडे मावळबद्दल बोलून अजितदादांना अडचणीत आणलं जात आहे. दोन्ही लोकनेत्यांचं अस्तित्व लोकसभेपर्यंत ठेवलं जाणार. त्यानंतर दोघांनाही संपवलं जाणार आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भाजपच्याच तिकीटावर लढतील, असं भाकीतच रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2019 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचं तिकीट कोणी कापलं हे त्यांनीही सांगावं. आज बावनकुळे पडळकरांची बाजू घेत आहेत. पण त्यांची परिस्थिती काय झाली आणि कोणी केली याचा विचार व्हावा, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपला कोणताही लोकनेता अडवत नाहीत. पंकजा मुंडे, भाऊसाहेब फुंडकर आणि आता नितीन गडकरी यांच्या बद्दल हेच झालं. मोहिते- पिचड यांच्या सारखं एकनाथ शिंदे यांचं होणार. आणि अजित दादांचंही तेच होतंय. शिंदेंच्या बाबतील स्टाईलने निर्णय घेतला जाईल. शिंदेना विधानसभा अध्यक्ष अपात्र ठरवणार नाहीत. पण कोर्टात जाणार आणि ते अपात्र होतील, असा दावाही त्यांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.