Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धैर्यशील माने यांनी पैरा फेडावा : सदाभाऊ खोत

धैर्यशील माने यांनी पैरा फेडावा : सदाभाऊ खोतकोल्हापूर : खरा पंचनामा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले. आता माने यांनी आमचा पैरा फेडण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत आपला प्रचार करावा, असे आवाहन माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज केले.

शासकीय विश्रामगृहात खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने केलेल्या झोन बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते. काही साखर कारखानदारांनी साखर महासंघामार्फत सरकारला झोन बंदी करण्याची विनंती केली होती. त्याला राज्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे एका रात्री झोन बंदीची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. झोन बंदी तत्काळ उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शरद पवार बडे मिया आणि रोहित पवार छोटे मिया आहेत. रोहित यांनी साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचेही खोत यांनी सांगितले. 

मतदारसंघात दीड वर्ष लोकांशी संपर्क ठेवला. लोकांचे प्रश्न सोडवले. त्यानंतर धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा आपल्यावर सोपवली. ही धुरा यशस्वीरित्या पार पाडली. आता २०२४ मध्ये याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे माने यांनी २०१९ चा पैरा फेडण्यासाठी माझा प्रचार करावा, असे आवाहन खोत यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.