Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'शासन आपल्या दारी'ला उपमुख्यमंत्री अजित पवारांची दांडी!

'शासन आपल्या दारी'ला उपमुख्यमंत्री अजित पवारांची दांडी!



बुलढाणा : खरा पंचनामा

बुलढाण्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असल्याने त्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे.

राज्यात जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेने वातावरण तापलं आहे. या परिस्थितीत काही ठिकाणचे शासन आपल्या दारी कार्यक्रमांची तारीख बदलण्यात आली असल्याचंही समजतंय. बुलढाण्यातील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित नाहीत. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेही कार्यक्रमाला आले नाहीत. कार्यक्रम सुरू झाला असून मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, रक्षा खडसे उपस्थित आहेत. तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समजते. अजित पवार यांची प्रकृी बरी नसल्याने ते मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार होते. याशिवाय त्यांचे पिंपरी चिंचवडमध्येही दोन कार्यक्रम नियोजित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.