Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल!

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल!



पुणे : खरा पंचनामा

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील कोलवडी येथे जाहीर सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात त्यांच्यासह सभेच्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शनिवारी सायंकाळी कोलवडी येथील एका मंगल कार्यालयात भिडे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना संभाजी भिंडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली. त्यांनी तिरंगा ध्वजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सोबतच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीही काही वादग्रस्त विधानं भिडे यांनी या सभेत केली. या प्रकरणी अखेर भिडे यांच्यासह आयोजकांवर पुण्यातील लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यापूर्वी देखील संभाजी भिडे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 'इंडिया आघाडीच्या बैठकीवर टिका' दरम्यान या सभेत बोलताना संभाजी भिडे यांनी इंडिया आघाडीच्या मुंबईमध्ये पार पडलेल्या सभेवर देखील जोरदार टीका केली आहे. ही बैठक कौरवाच्या वंशाची असल्याचं वादग्रस्त विधान भिडे यांनी केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.