'...तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन'!
वाशिम : खरा पंचनामा
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमातून बोलताना नितीन गडकरी यांनी आमदार-खासदारांना रस्त्याच्या कामावरून टोला लगावला.
मी प्रेशर आणून ठेकेदाराकडून काम करून घेतो, मात्र तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका, असा सज्जड दम नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील आमदार-खासदारांना दिला आहे. तसंच रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला तर मी कॉन्ट्रॅक्टरला बुलडोजरखाली टाकीन, असा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे.
वाशिम जिल्ह्यातील 3,655 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच 595 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. विदर्भातील वाशिम आणि गडचिरोली जिल्हा निती आयोगाने निकाषानुसार मागास आणि अकांक्षित जिल्हे म्हणून घोषीत केले आहे. ही बाब माझ्यासह सर्वांसाठी अभिमानाची बाब नाही, त्यामुळे मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.
राजकारणात खोटं बोलण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर चांगले काम केले असेल तर लोक तुम्हाला मानतात त्यासाठी पोस्टर, बॅनर लावण्याची काहीच गरज काय? असा टोलाही नितीन गडकरी यांनी लगावला.
राजकारणात खोटं बोलायचं काम नाही, निवडणुकीत बॅनर लावणार नाही, कोणाला दारू पाजणार नाही, मी पैसे खाऊ घालणार नाही आणि खाणार नाही. मला फक्त लोकांची सेवा करायची आहे, असं वक्तव्यही नितीन गडकरी यांनी केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.