'डीजे' मुळे तरुणाचा मृत्यू, दुधारीतील गणेश मंडळाच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा!
इस्लामपूर : खरा पंचनामा
पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विना परवाना गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून 'डीजे' लावल्याबद्दल दुधारी (ता. वाळवा) येथील त्रिमूर्ती मंडळाच्या ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
'डीजे'च्या दणदणाटानंतर दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी केवळ विना परवाना मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
रमजान मुल्ला, उत्तम कुंभार, दीपक कांबळे, योगेश गोतपागर, संकेत पाटोळे, तानाजी शिरतोडे, सुशांत पाटोळे, विशाल बनसोडे, विनोद पाटोळे, महेश दळवी (सर्व रा. दुधारी), सुरज मुलाणी (वय २५, रा. बलवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कमरुद्दीन मुलाणी याने त्याचे ताब्यातील वाहन (एमएच ०९ ए ७७५१) मध्ये विना परवाना साऊंड सिस्टीम लावून सार्वजनिक उपद्रव करून व पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला. त्यामुळे सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कलम १८८,२९०, २९९, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ (२) (३) / १३१ प्रमाणे कायदेशीर तक्रार दिली आहे. सहायक निरीक्षक हरिशचंद्र गावडे पुढील तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.