Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या निरीक्षक संजय हारुगडे इस्लामपूरचे प्रभारी

सांगलीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या
निरीक्षक संजय हारुगडे इस्लामपूरचे प्रभारी



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आज रविवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी उपाधीक्षक संदेश नाईक, मनीषा कदम, राहुल चव्हाण यांचा कालावधी पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागी बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच एका सहायक निरीक्षकासह दोन उपनिरीक्षकांच्या विनंतीनुसार बदली करण्यात आली.

जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची कवठेमहांकाळ ठाण्याचे प्रभारी म्हणून तर वाचक शाखेतील निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांची आष्टा पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सायबर शाखेचे निरीक्षक संजय हारूगडे यांची इस्लामपूर ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 

सहायक निरीक्षक संतोष गोसावी यांची कोकरूड ठाण्यात विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक प्रफुल्ल कदम यांची सांगली ग्रामीण येथे, उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांची कडेगाव येथे तर सचिन मद्वाण्णा यांची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात विनंतीनुसार बदली करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.