Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहा हजारांची लाच घेताना एपीआय, कॉन्स्टेबल जाळ्यात!

दहा हजारांची लाच घेताना एपीआय, कॉन्स्टेबल जाळ्यात!



नाशिक : खरा पंचनामा

तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना अभोणा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई यांना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. 

एपीआय नितीन जगन्नाथ शिंदे (वय 39) व पोलीस शिपाई कुमार गोविंद जाधव (वय 42) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई अभोणा पोलीस ठाण्यात केली.

याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व पोलीस शिपाई कुमार जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

नाशिक एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता एपीआय शिंदे व पोलीस शिपाई जाधव यांनी तक्रारदार यांच्या विरोधातील तक्रार अर्जाच्या चौकशीत गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अभोणा पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.