Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्याने विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा!

धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्याने विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा! 



सोलापूर : खरा पंचनामा 

यळकोट यळकोट, जय मल्हार म्हणत शंकर बंगाळे या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या सुरक्षारक्षकांनी शंकर बंगाळे यांना लाथ्याबुक्यांनी मारहाण करत त्याला ताब्यात घेतले. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे धनगर कृती समितीचा कार्यकर्ता शंकर बंगाळे यांनी त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहावर थांबला होता. त्यानंतर त्यांनी भेटण्याची विनंती केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भेटायला बोलवले होते. त्यावेळी हा सारा प्रकार घडला आहे. 

राज्यात सध्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा अध्यादेश काढण्यात आला. मात्र त्यावरही जरांगे पाटील यांनी आक्षेप घेत त्यात काही दुरुस्ती सुचवल्या आहेत. एकीकडे हे प्रकरण तापले असतानाचा धनगर आरक्षणाचा मुद्याही गाजतो आहे. 

आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि धनगर कृती समाजाचा कार्यकर्ता शंकर बंगाळे सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी थांबला होता. त्यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर थांबला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना बोलवून घेतले.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.